नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कामगिरी ; आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांची टोळी जाळ्यात : चोरीच्या 32 दुचाकी जप्त

मध्यप्रदेश, गुजरात राज्यासह नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील 19 दुचाकी चोरीचे गुन्हे उघड


Major achievement by Nandurbar Crime Branch ; inter-state motorcycle theft gang nabbed ; 32 stolen two-wheelers seized नंदुरबार (27 जून 2026) : नंदुरबार गुन्हे शाखेने गोपनीच्या माहितीच्या आधारे मोटारसायकल चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. अटकेतील चोरट्यांकडून तब्बल 30 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या एकूण 32 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या तर नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील 19 चोरीचे गुन्हे उघड झाले. अन्य दुचाकींबाबत वाहनाच्या चेचीस व इंजिन क्रमांकावरून दुचाकी मालकांचा शोध सुरू आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दुचाकी चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकास कारवाईचे निर्देश दिले. शुक्रवार, 26 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, दोन संशयित व्यक्ती म्हसावद गावातील चिखली फाटा परिसरात चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले.



दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश
पथकाने सापळा रचून संशयीत बलवान उर्फ अजय ज्ञानेश्वर खर्डे (29, रा.अंबापूर, ता.शहादा) व हिंमतसिंग सत्तरसिंग पावरा (29, पावरा कॉलनी, म्हसावद, ता.शहादा) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी साथीदार रिजवान दगडू तेली (29, कुबेरनगर, म्हसावद, ता.शहादा) यांच्यासोबत दुचाकी चोरींची कबुली दिली तसेच सोबतची दुचाकी दोन महिन्यांपूर्वी खेडकोचरा माता मंदिर भागातून चोरल्याची माहिती दिली.

चोरीच्या 32 दुचाकी जप्त
आरोपींनी आतापर्यंत एकूण 32 दुचाकी चोरी केली असून त्या कमी किंमतीत मित्र, नातेवाईक तसेच परिचितांना विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर या दुचाकी जप्त करण्यात आल्या. तपासादरम्यान जप्त दुचाकींपैकी 19 गुन्ह्यांचा छडा लागला आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद व उपनगर तसेच नाशिक जिल्ह्यातील पाच व मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यातील सहा गुन्ह्यांचा समावेश आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई नंदुरबार अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, जितेंद्र पाडवी, मुकेश तावडे, विशाल नागरे, दिनेश चित्ते, सुनील येवले, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, मनोज महाजन, रामेश्वर चव्हाण, विनोद पाटील, सचिन सैंदाणे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !