जळगाव तालुका हादरला : नऊशे रुपयांच्या वादातून बालकाचा मृत्यू : आरोपीला अटक


Jalgaon Taluka Shaken : Boy Dies Following Dispute Over 900 Rupees ; Accused Arrested जळगाव (27 जून 2026) : उधारीचा वाद दोघांमध्ये सुरू असताना संशयीताने लाकडी दांडा दुसर्‍याला मारण्यासाठी उगारताच त्याचा फटका अवघ्या सहा वर्षीय बालकाला बसल्याने त्याचा करुण अंत झाला. ही धक्कादायक व तितकीच संतापजनक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात घडली. वंश सुनील बारेला (सहा, रा. उनपदेव, अडावद, ता. चोपडा) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी मच्छिंद्र रमण पाटील (32, रा.आव्हाने) या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

काय घडले आव्हाने गावात ?
जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाने शिवारातील म्हशींच्या गोठ्याचे व शेताचे रक्षण करण्यासाठी बारेला कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून तेथे वास्तव्यास आहे. या गोठ्यात काम करणारा भावेश धनगर याच्याकडे आरोपी मच्छिंद्र पाटील याचे 900 रुपये घेणे होते.



शनिवारी या पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपीने जवळील लाकडी दांडक्याने भावेश धनगर याच्यावर वार केला मात्र भावेशने तो वार चुकवल्याने हा फटका जवळच उभा राहून भांडण पाहत असलेला वंश बारेलाला बसताच त्याचा मृत्यू झाला. जळगाव तालुका पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेत संशयीत आरोपीला अटक करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !