जळगाव शहर पोलिसांची कामगिरी : घरफोडीचा गुन्हा पाच तासात उघड

गेंदालाल मिल परिसरातील दोन सराईत चोरटे जाळ्यात ः गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त


Jalgaon City Police Achievement: Burglary case solved within five hours जळगाव (27 जून 2026) : जळगाव शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांचा अवघ्या पाच छडा लावत दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा सुमारे 63 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यात पोलिसांना यश आले आहे.

पाच तासात घरफोडी उघड
गुरुवार, 25 जून 2026 रोजी रात्री 10 ते 26 जून रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान, शिवाजीनगर परिसरातील सुशील भाईलाल भावसार यांच्या घरातून चोरट्यांनी डेल कंपनीचा लॅपटॉप, दोन अँड्रॉइड मोबाईल, कळशी आदी मिळून एकूण 63 हजारांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



सराईत चोरट्यांना अटक
गुन्ह्याचा तपास सुरू असताना शहर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत राफत शेख फिरोज (20, गेंदालाल मिल, जळगाव) व शेख शारीम शेख मुशेफ उर्फ मुसाब (20, शिवाजीनगर, हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला डेल कंपनीचा लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, विवो कंपनीचा मोबाईल, कळशी आदी मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून आणखी काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर सिंगी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील एएसआय सुनील पाटील, दीपक शिरसाठ, हवालदार उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, पोहेकॉ. योगेश पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, अमोल वाघुरे, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार, भगवान मोरे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !