नवापूर पोलिसांची कारवाई : सुरतहून आंध्रप्रदेशात जाणारा पाच लाख 20 हजारांचा गुटखा जप्त

राजस्थानच्या चालकाला बेड्या : 30 लाख रुपयांचा कंटेनर जप्त


Navapur Police Action: Gutkha worth ₹5.20 lakh seized while being transported from Surat to Andhra Pradesh नवापूर (28 जून 2026) : सुरतहून पार्सलच्या मालाआड गुटख्याची कंटेनरद्वारे आंध्रप्रदेशकडे वाहतूक होणार असल्याची माहिती नवापूरचे निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह कारवाई करीत पाच लाख 20 हजारांचा गुटखा व 30 लाखांचा कंटेनर जप्त केला. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजस्थान राज्यातील कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शुक्रवार, 26 जून 2026 रोजी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना सुरत (गुजरात) येथून विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे जाणार्‍या एका कंटेनरमधून विविध साहित्याच्या पार्सलसोबत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने नवापूर येथील कुणाल हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गावर विशेष नाकाबंदी करण्यात आली. रात्री सुमारे 2 वाजता कंटेनर (आर.के.19 जी.के.1963) आल्यानंतर तपासणी केली असता त्यात विविध साहित्याच्या पार्सलखाली लपवून ठेवलेले 500 नग मेजबान जाफरानी जर्दा तंबाखूची मोठी पाकिटे (किंमत 2 लाख 20 हजार) तसेच सुमारे 300 किलो बिनलेबलचा सुगंधी तंबाखू (किंमत 3 लाख) असा एकूण पाच लाख 20 हजारांचा प्रतिबंधित माल आढळून आला तसेच 30 लाख किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला.



अन्न व औषध प्रशासन विभागाची धाव
तत्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती कळवल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास डौले यांनी नवापूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून जप्त मालाची तपासणी केली. त्यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात कंटेनर चालक कायमदीन खान सुलतानखान (22, श्यामपुरा, ता.गिरा, जि.बारमेर, राजस्थान) विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे, पोलीस हवालदार दिनेशकुमार वसुले, पोलीस हवालदार किशोर वळवी, पोलीस शिपाई दिनकर चव्हाण, पोलीस शिपाई अतुल पानपाटील, पोलीस शिपाई समाधान केंद्रे, संजय गावीत आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !