चाळीसगावात आंदोलनादरम्यान माजी खासदार उन्मेश पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकाला शिविगाळ : पोलिसांनी दाखल केला गुन्हा
Former MP Unmesh Patil verbally abuses a Police Sub-Inspector during a protest in Chalisgaon; police register a case चाळीसगाव (29 जून 2026) : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर रविवार, 28 रोजी विविध मागण्यांसाठी ‘जनतेचा आवाज पोलीस प्रशासनाविरोधात’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मार्गदर्शन करताना माजी खासदार उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव शहर ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याबाबत अश्लील शब्दात शिविगाळ करून बदनामीकारक वक्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी शहर पोलिसात माजी खासदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले चाळीसगावात ?
चाळीसगाव शहर ठाण्याचे हवालदार योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चाळीसगावचे पत्रकार किसनराव जोर्वेकर यांच्याविरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा माजी खासदारांना राग होता व रविवारी दुपारी 12 वाजता त्यांनी चाळीसगाव शहर ठाण्याबाहेर ‘जनतेचा आवाज पोलीस प्रशासनाविरोधात’ आंदोलन केले. आंदोलनात मार्गदर्शन करताना पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविरोधात वक्तव्य करताना खाकी वर्दीतील रक्षक नव्हे भक्षक असा उल्लेख करीत उपस्थित जनसमुदायासमोर उपनिरीक्षकाला अश्लील भाषेत शिविगाळ केली.


या प्रकरणी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. माजी खासदाराविरोधात गुन्हा दाखल झाल्याने चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
