जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई : गावठी कट्ट्यासह कुसूंब्यातील तरुणाला बेड्या

गोपनीय माहितीच्या आधारे कुंभारखेडा परिसरात सापळा : 20 हजार रुपयांचा गावठी कट्टा जप्त


Jalgaon MIDC Police Action : Youth from Kusumba arrested with a country-made pistol जळगाव (29 जून 2026) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्‍यांविरोधात कारवाई करत कुसूंब्यातील तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 20 हजार रुपये किंमतीचा एक लोखंडी, काळ्या रंगाचा गावठी कट्टा (मॅगझीनसह) जप्त केला आहे. ही कारवाई रविवार, 28 जून रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जळगाव विमानतळासमोरील कुंभारखेडा परिसरातून धनवड गावाकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी सापळा रचत संशयीत गणेश श्रावण सोनवणे (24, कुसुंबा, ता.जळगाव) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जिन्स पँटच्या मागील बाजूस, कमरेला खोचलेला गावठी कट्टा (मॅगझीनसह) आढळून आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, हवालदार रमेश बाबूलाल चौधरी, हवालदार रामकृष्ण पाटील, कॉन्स्टेबल किरण पाटील, कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, कॉन्स्टेबल सुभाष साळवे, कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, कॉन्स्टेबल राहुल येथे, कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, कॉन्स्टेबल शशिकांत मराठे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !