यावल शहरातील सूतगिरणीला आग : रुईचे गठ्ठे, मशिनरी जळाल्याने कोट्यवधींचे नुकसान
Fire at Yaval city spinning mill: Cotton bales and machinery gutted, causing losses worth crores यावल (29 जून 2026) : यावल शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ डॉ.शैलेश प्रभाकर खाचणे सूतगिरणीला सोमवार, 29 रोजी सकाळी अचानक आग लागली. यात सूतगिरणीत नुकतेच आलेल्या कापूस रुईचे 300 गाठी जळाल्या. हा प्रकार सकाळी उघडकीस येताच तातडीने रावेर, सावदा, फैजपूर, यावल आणि भुसावळ येथून अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. आग विझवायला तब्बल चार तास लागले. चार तासानंतर आग आटोक्यात आली. दुपारी महसूल विभागाकडून आगीचा पंचनामा करण्यात आला यामध्ये सुमारे 75 लाखांची रुई तसेच दोन मशीन जळून खाक झाल्याने सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले तर आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.
अचानक लागली आग
यावल शहरात शासकीय विश्रामगृहाच्या पुढे डॉ.शैलेश प्रभाकर खाचणे सूतगिरणी आहे. या सूतगिरणीला सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग सुतगिरणीच्या गोदामास लागली तेथे नुकतेच मागवलेले कापसाच्या कॉटन आणि पॉलिस्टरचे 300 गठ्ठे होते ते या आगीत जळाले. गोदामातुन धूर निघताना दिसल्यानंतर सुरक्षा रक्षकाने अग्निशमन दलास माहिती दिली. संपूर्ण सुतगिणीला आगीचा वेळा वाढू नये म्हणून तत्काळ रावेर, सावदा, फैजपूर, यावल, भुसावळ येथून अग्निशमन बंब बोलावण्यात आले.


सहा बंबांनी मिळवले नियंत्रण
यावल नगर पालिकेचे दोन अग्निशमन बंब अशा सहा बंबांनी आगीवर वेळेतच नियंत्रण मिळवले व गोदामाच्या बाहेर कुठेच आग पसरू दिली नाही. असे असले तरी याआगीत 75 लाख रुपये किंमतीच्या कापसाच्या कॉटनच्या रुईचे तसेच पॉलिस्टरच्या रुईचे सुमारे 300 गठ्ठे जळाले तर 25 लाख रुपये किंमतीची कापसाच्या रुईवर प्रोसेस करणारी दोन मशीन जळाली.
आगीत एक कोटींचे नुकसान
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यावल अग्निशमन दलाचे कैलास काटकर, शिवाजी पवार, कृष्णा पाटील, पवन खैरे, गणेश कोळी यांनी परिश्रम घेतले घटना घटनेची माहिती मिळताच यावल तलाठी पवन नवगाळे हे पथकासह दाखल झाले. त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला. पंचनाम्यात सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
