दागिने पाहण्याच्या बहाण्याने कुर्‍हेपानाचेतील सराफाला सव्वातीन लाखांचा गंडा


Kurhepanaat-based jeweller swindled out of ₹3.25 lakh under the pretext of viewing jewellery भुसावळ (30 जून 2026) : सराफा दुकानातील दागिने पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने हातचलाखीने सराफा दुकानातून तीन लाख 18 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. ही घटना भुसावह तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील कमल स्वरुप ज्वेलर्समध्ये 23 रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हातचलाखीने दागिने लंपास
कुर्‍हेपानाचे गावातील मुख्य रस्त्यावर प्रमोद स्वरूपचंद छाजेड (57) यांचे कमल स्वरुप ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. मंगळवार, 23 रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान अनोळखी चोरट्याने दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करीत विविध दागिने पाहण्यासाठी हातात घेतले व दुकानदाराची नजर चुकवून भामट्याने एक लाख 10 हजार 780 रुपये किंमतीची 11.780 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 72 हजार 200 रुपये किंमतीची 7.220 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 50 हजार 300 रुपये किंमतीचे 5.30 गॅ्रम वजनाचे कानातील झुंबर, 30 हजार 400 रुपये किंमतीचे 3.40 गॅ्रम वजनाचे सोन्याचे टॉप्स मिळून एकूण तीन लाख 18 हजार 980 रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर छाजेड यांनी भुसावळ तालुका पोलिसात सोमवार, 29 रोजी तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



सीसीटीव्हीवरून चोरट्याचा शोध
भुसावळ तालुका निरीक्षक निलेश गायकवाड व सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तपास हवालदार विकास बाविस्कर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !