पाचोरा तालुक्यातील 29 वर्षीय महिलेवर अत्याचार


पाचोरा (30 जून 2026) : पाचोरा तालुक्यातील 29 वर्षीय महिलेवर लग्न करण्याच्या आमिषाने अत्याचार करण्यात आला मात्र फसवणूक झाल्याची खात्री होताच महिलेने पाचोरा पोलिसात तक्रार नोंदवली. संशयीत आरोपी अजय समाधान जाधव (पाचोरा तालुका) यास पोलिसांनी अटक केली आहे.

असे आहे फसवणूक
पाचोरा तालुक्यातील एका गावात 29 वर्षीय पीडीता वास्तव्यास असून आरोपीदेखील त्याच गावचा रहिवासी आहे. आरोपीने पीडीतेला लग्न करण्याचे आमिष दाखवत पीडीतेच्या गावात व पाचोर्‍यातील हनुमान नगरात मागील दोन वर्षांपूर्वी तसेच 13 मे 2026 व नंतर वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप पीडीतेने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !