भुसावळ बसस्थानकात कचरा वेचणार्‍या तरुणाचा विजेच्या शॉकने मृत्यू


Youth picking up trash at Bhusawal bus station dies of electric shock. भुसावळ (1 जुलै 2026) : कचरा वेचून गुजराण करणार्‍या 25 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवार, 29 जून 2026 रोजी सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास भुसावळ बसस्थानकात घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रवीण किसन सिरसोेदे (25, रा.हुडको, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण
वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर जगन्नाथ चाटे (50) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या खबरीनुसार, मंगळवार, 29 जून रोजी सकाळी बसस्थानकामागे गेल्यानंतर त्यांना एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. प्रवांशाकडे चौकशी केली असता त्याची ओळख प्रवीवण किसन सिरसोेदे (25, रा. हुडको, भुसावळ) असल्याची पटली शिवाय प्रवीण हा बसस्थानक परिसरात कचरा वेचण्याचे काम करीत असल्याचे सांगण्यात आले. चाटे यांनी मृताजवळ जावून पाहिल्यानंतर प्रवीणच्या हाताला इलेक्ट्रिक कट झालेली वायर लागलेली दिसली. विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला.



बाजारपेठ पोलिसात नोंद
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक गोविंदा जगन सपकाळे यांनी प्रवीणला तातडीने ट्रॉमा केअर सेंटरला नेले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. तपास एएसआय पारीष जाधव हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !