धक्कादायक: पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या नराधमाचा फैजपूरात 75 वर्षीय वृद्धेवर अत्याचार


A 75-year-old woman was sexually assaulted in Faizpur by a depraved man who had entered her home under the pretext of asking for water फैजपूर (1 जुलै 2026) :  पाणी पिण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयीताने शहरातील एका भागातील 75 वर्षीय वृद्धेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. रवी चव्हाण (45, फैजपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काय घडले शहरात ?
75 वर्षीय पीडीत वृद्धा सोमवारी दुपारी आपल्या घरात भुईमूगाच्या शेंगा फोडत असताना आरोपी रवी चव्हाण हा पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी आला व वृद्धा पाणी आणण्यासाठी घरात गेल्यानंतर आरोपीने तिचा हात पकडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. गप्प बस, नाहीतर खल्लास करून टाकीन, अशी धमकी देत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.



ही घटना सोमवार, 29 जून रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता घडली. घडल्यानंतर प्रकारानंतर बदनामीच्या भीतीने पीडीतेने तत्काळ तक्रार दिली नाही मात्र पीडीतेने कुटूंबाकडे घडल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर मंगळवार, 30 जून रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी रवी चव्हाणविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !