भुसावळात दोन महिन्यांत दुसर्‍यांदा बिअर शॉपी फोडली

चोरी करताना चोरट्यांनी बियरही रिचवल्या : ओळख न पटण्यासाठी डीव्हीआर तोडला


Beer shop broken into for the second time in two months in Bhusawal भुसावळ (2 जुलै 2026) : दोन महिन्यात दुसर्‍यांदा यावल रोडवरील बिअर शॉपी फोडून चोरट्यांनी शहर पोलिसांच्या गस्तीला आव्हान दिले. विशेष म्हणजे यावेळी चोरी करताना चोरट्यांनी फ्रिजमधील थंडगार बियरही रिचवल्या. या प्रकरणी शहर पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
भुसावळातील यावल रोडवर बलवंतसिंग बहादुरसिंग पटेल (55, अकलूद, ता.यावल) यांचे पटेल बिअर शॉपी नामक दुकान आहे. यापूर्वी 7 मे 2026 रोजी याच दुकानातून चोरट्यांनी 10 हजार रुपये लांबवले व गुन्हादेखील दाखल झाला. पोलिसांकडे चोरीचे फुटेज असूनही गुन्ह्याची उकल होवू शकली नसताना चोरट्यांनी दुसर्‍यांदा या दुकानात 30 जूनच्या रात्री 10 ते 1 जुलैच्या सकाळी नऊवाजेदरम्यान चोरी केली.



अनोखी शक्कल लढवत चोरी
चोरट्यांनी बिअरशॉपीत प्रवेशासाठी एका टेबलवर खुर्ची ठेवली आणि मोठ्या लाकडाच्या दांड्याने खिडकीचा लोखंडी गज तोडला. अवघ्या एक फुटाच्या या खिडकीतून चोरट्यांनी शॉपीत प्रवेश करीत गल्ल्यातील सहा हजारंची रोकड लुटली तर ओळख न पटण्यासाठी पाच हजार रुपये किंमतीच्या डीव्हीआरही चोरून नेला. पटेल यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय जगन सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !