चाळीसगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा


Non-cognizable offense registered against former Chalisgaon MP Unmesh Patil चाळीसगाव (2 जुलै 2026) : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यासमोर 28 जून रोजी झालेल्या धरणे आंदोलनात माजी खासदार उन्मेष पाटील यांनी फारुख खान उर्फ बाबा ठेकेदार यांना उद्देशून सार्वजनिक ठिकाणी शिविगाळ करून बदनामी केल्याने त्यांनी शहर पोलिसात या प्रकरणी तक्रार दिल्यावरून माजी खासदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी पोलीस उपनिरीक्षकाला शिविगाळ केल्याने माजी खासदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता पुन्हा दुसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
28 जून रोजी चाळीसगाव शहर ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना माजी खासदार उन्मेष पाटील यांनी फारुख खान उर्फ बाबा ठेकेदार यांना उद्देशून शिविगाळ केल्याचा आरोप आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 352 आणि भारतीय न्याय संहिता कलम 356(3) अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !