सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : दोन अभिनेत्रींची सुटका
Sex racket busted : Two actresses rescued मुंबई (28 जून 2026) : गिरगावात पोलिसांनी हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. अभिनेत्रीच चक्क या व्यवसायात अडकल्याने मोठी खळबळ उडाली तर आता या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एक मराठीतली आघाडीची अभिनेत्री असून दुसरी बॉलिवूडमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री असल्याची माहिती आहे. या दोघांची ओळख पोलिसांनी उघड केलेली नाही.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरात एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका आलिशान हॉटेलमध्ये छापेमारी करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या ‘मानवी तस्करी विरोधी कक्षा’नं ही कारवाई केली. हे रॅकेट बर्याच काळापासून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे अनैतिक देहव्यापारासाठी दोन्ही अभिनेत्री आल्या होत्या व त्यांची सुटका यावेळी करण्यात आली. एक अभिनेत्री सिनेसृष्टीत कार्यरत असून त्यांनी अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सुटका करण्यात आलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे, जिनं अनेक सिनेमांत मुख्य भूमिका केल्यात, तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि हिंदी सिनेमांमध्ये छोट्या आणि ‘कॅमिओ’ भूमिकांमध्ये झळकलीय. हे रॅकेट चालवताना रंगेहाथ पकडलेला एजंट प्रत्यक्षात एक ‘मेकअप आर्टिस्ट’ आहे, जो विविध सेलिब्रिटींसोबत काम करतो. त्यानंच या अभिनेत्रींना या रॅकेटमध्ये ओढलेलं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आलीय. पोलिसांनी आरोपी मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
मोठी नावे समोर येण्याची शक्यता
मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि कसून तपास करतेय. पोलीस आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची बारकाईनं तपासणी करत आहेत. त्याचबरोबर, या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींची कसून चौकशी केली जातेय, हॉटेल व्यवस्थापनाचा यात काही सहभाग आहे का? याचाही तपास सुरू आहे. हे एक ’हाय-प्रोफाईल’ रॅकेट मानलं जात असून त्यात बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे त्यामुळेच आगामी काळात आणखी काही महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
