अकोल्यात ट्रॅप झालेल्या सह जिल्हा निबंधकांच्या जळगावातील घरात सापडले तीन कोटींचे घबाड : एक कोटी 53 लाखांची रोकडसह 422 ग्रॅम सोने व लाखोंच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे जप्त


गणेश वाघ
A massive haul was discovered at the home of the Jalgaon District Registrar—who had been caught in a trap in Akola—comprising ₹1.53 crore in cash, 422 grams of gold, and property documents worth lakhs जळगाव (28 जून 2026) : अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रकरणात अटक केलेल्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-1) किरण पुरुषोत्तम चौधरी (साईप्रभा आर्केड, जळगाव) यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना अलीकडेच अटक केली होती. विशेष म्हणजे जळगाव एसीबीने हे घर सील केल्यानंतर चौधरींच्या नातेवाईकांनी हे घर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क नागरिकांमुळे घरफोडी टळली होती. याच घरात आता एसीबीला कोट्यवधींचे घबाड गवसले असून या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कोट्यवधींचे घबाड गवसले
एसीबीच्या माहितीनुसार, आरोपीच्या घरातून एक कोटी 53 लाख 84 हजार 630 रुपयांची रोकड, 60 लाख 57 हजार 135 रुपये किंमतीचे 422 गॅ्रम सोन्याचे दागिने, 62 लाख 13 हजार 376 रुपये किंमतीचे आरोपी व त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने असलेले प्रॉपर्टीचे पेपर्स, 31 हजार 416 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने, 11 लाख 52 हजार 745 रुपये किंमतीचे सोने खरेदी केल्याच्या पावत्या, सहा लाख 25 हजार 545 रुपये किंमतीच्या घरातील वस्तू असा एकूण दोन कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण!
खास सूत्रांच्या माहितीनुसार, अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्यातील सहाय्यक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांना 25 जून रोजी दहा हजारांची लाच घेताना कार्यालयातच अटक केली व न्यायालयाने नंतर त्यांना एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याचदरम्यान आरोपी चौधरी हे जळगावातील साईप्रभा आर्केड, गणेश कॉलनी येथे वास्तव्यास असल्याने घर पुढील घरझडतीसाठी जळगाव एसीबीच्या पथकाने सीलबंद केले होते.

आरोपींच्या नातेवाईकांकडून जळगावात घरफोडीचा डाव
रविवार, 28 रोजी रात्री या घरातून काहीतरी आवाज येत असल्याची व घराबाहेरील दिवे सुरू असल्याची माहिती सतर्क शेजार्‍यांनी जळगाव एसीबी अधिकार्‍यांना दिल्यानंतर एसीबी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घराच्या पाठीमागील बाजूने शिडी लावून आत प्रवेश केलेल्या दोन इसमांना रंगेहात पकडण्यात आले. अटकेतील आरोपींमध्ये प्रसाद वसंत नारखेडे (33, रा.डांभूर्णी, ता.यावल) व प्रवीण अशोक महाजन (36, रा.गणेश कॉलनी, जळगाव) यांचा समावेश हे आरोपी चौधरी यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे जिल्हापेठ पोलिसांच्या तपासात समोर आले.

यांनी केली कारवाई
जळगावातील घराची झडती पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, ग्रेडेड उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार किशोर महाजन, कॉन्स्टेबल सचिन पाटे, मनोज पाटील, अमोल सूर्यवंशी, राकेश दुसाने, भूषण पाटील, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !