वाकोदला रस्त्याच्या वादातून काका-पुतण्यावर प्राणघातक हल्ला


Uncle and nephew attacked with intent to kill over a road dispute in Wakod. जामनेर (3 जुलै 2026) : जामनेर तालुक्यातील वाकोद येथे रस्त्यावरून दुचाकी नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाले. या प्रकरणी पहूर पोलिसात दोन जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी यावेळी काका-पुतण्यावर कुर्‍हाडी तसेच लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे.

असे आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, 1 जुलै रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता फिर्यादी गजानन साहेबराव जोशी यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. दुचाकी रस्त्यावरून नेत असताना झालेल्या वादानंतर संशयीत आरोपी कैलास आत्माराम जोशी व विलास आत्माराम जोशी यांनी लोखंडी कुर्‍हाड व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी गजानन जोशी तसेच त्यांचे काका अशोक जोशी जखमी झाले.


जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अहवालानंतर पहूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !