रावेर पोलिसांनी रोखली अवैध गुरांची वाहतूक : तीन गुरांची सुटका


Raver police intercept illegal cattle transport; three cattle rescued. रावेर (3 जुलै 2026) : कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून गुरांची वाहतूक केली जात असताना रावेर पोलिसांनी तीन गुरांची सुटका केली. या कारवाईत तीन गुरे आणि त्यांची वाहतूक करणारे छोटा हत्ती वाहन असा एकूण एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गुरुवार, 2 जुलै रोजी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास लालमाती गावातील आश्रम शाळेजवळ छोटा हत्ती (एम.एच.46 ई 0903) क्रमांकाच्या वाहनातून दोन बैल व गोवंश जातीच्या गोर्‍ह्याची अत्यंत निर्दयतेने वाहतूक होताना दिसून आली. प्राथमिक तपासात संबंधित गुरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक पशुवैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले तसेच गुरांसाठी चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने ही वाहतूक कत्तलीच्या उद्देशाने होत असल्याचे स्पष्ट होताच पोलीस कॉन्स्टेबल इस्माईल दगेखा तडवी यांच्या फिर्यादीवरून संशयीत नसरोद्दीन इकरामोद्दिन शेख (64, रा.मर्चंट बँकेजवळ, रावेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !