मोठी बातमी : शाळा परिसरात आता स्टिंग पेय विक्रीला बंदी
Big News : Sale of ‘Sting’ drink now banned on school premises मुंबई (3 जुलै 2026) : भाजपा आमदारांच्या प्रश्नानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी राज्यातील शाळांच्या परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी आता तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत खात्यातर्फे काटेकोरपणे केली जाणार आहे.
भाजपा आमदारांनी मांडला प्रश्न
पावसाळी अधिवेशनात श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग पेयबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने मंत्री झिरवळ यांनी स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्याचे निर्देश दिले.

दारुपेक्षाही स्टिंग एनर्जी ड्रीक घातक
स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. नियमात बसत असले तरी मुलांना याची सवय लागते. लहान मुले, गरोदर महिलांसाठी पिण्यासाठी योग्य नसल्याचे स्टिंग पेयच्या बाटलीवरचं लिहिले आहे. लहान मुलांना याची विक्री होवू नये. दारूपेक्षाही स्टिंग एनर्जी ड्रिंक हे घातक आहे, अशी माहिती श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत दिली. यावर स्टिंग हे शाळेच्या आवारात हे विकले जातंय हे मान्य आहे. शाळांच्या 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह स्टिंग एनर्जी ड्रिंकवरही बंदी घालू, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली. (
तुकाराम मुंढे विधानभवनात दाखल
शुक्रवारी विधानसभेत स्टिंग एनर्जी ड्रिंकबाबत चर्चा असल्याने तुकाराम मुंढे विधानभवनात दाखल झाले होते. राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवली जात असून अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानूसार महाराष्ट्रभर नियमांचे उल्लंघन करणार्या रेस्टॉरंटवर देखील कारवाई केली जात आहे.
तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत तपासणी सुरू
अनेक पेय उर्जा देण्याच्या नावाखाली शाळा परिसरात ड्रिंक्स विक्री, शाळा परिसरात फ्लेवर पानाखाली अंमली पदार्थ विक्री होते, चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार राहुल कुल यांनी केली. दुध भेसळ फ्लेवर मिल्क नावाखाली विक्री होते, जास्त साखर, कृत्रिम द्रव्य वापर होतो, याचीही चौकशी केली जावी, असे राहुल कुल म्हणाले. यावर तुकाराम मुंढे यांच्या अंतर्गत तपासणी सुरू असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवळांनी विधानसभा सभागृहात दिली.
