जळगावातील मोटारसायकल चोरटा ‘शाहरुख खान’ पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई : 25 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त


Jalgaon motorcycle thief ‘Shah Rukh Khan’ caught in police net जळगाव (3 जुलै 2026) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली स्प्लेंडर प्रो कंपनीची ग्रे रंगाची व 25 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
गॅरेज व्यावसायीक दस्तगीर अल्लाउद्दीन पिंजारी (43, प्लॉट क्र. 42, गट क्र. 194, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार, 29 जूनच्या रात्री 11 ते 30 जूनच्या पहाटे 5 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोर उभी असलेली स्प्लेंडर प्रो मोटारसायकल (एम.एच,19 बी.सी.5162) तसेच त्यांच्या साथीदार रिजवान अजहर खान यांच्या इंद्रप्रस्थ नगर येथील भंगार दुकानाचे शटर उचकटून त्यातील 6,300 रुपये रोख, सुमारे 10 किलो पितळेचे तुकडे व पिनांचे बटन असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


गोपनीय माहितीवरून कारवाई
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी शाहरुख खान सलीम खान (26, रा. प्लॉट क्र. 17, 163/3, इंद्रप्रस्थ नगर, पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून सुमारे 25 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार गिरीश पाटील करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गिरीश दिलीप पाटील, प्रमोद लांडगेसरी, मोतीलाल बोरसे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !