अमळनेरात खळबळ : पत्नीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करण्यासाठी मद्यासह भांग पाजली : पतीसह तिघांविरोधात गुन्हा


अमळनेर (5 जुलै 2026) : पत्नीला वेश्या व्यवसाय करायला लावण्यासाठी तिला दारू पाजून भांग खाऊ घालत मारहाण करण्यात आल्याची घटना 1 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तांबेपुरा भागात नऊ वाजता घडली. पती जेठाणी आणि अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
पीडीत विवाहितेच्या तक्रारीनुसार, 1 जुलै रोजी दुपारी दोन वाजता तब्येत बरी नसताना पती फिरोज रहेमतूल्ला पिंजारी हा घरी आला व त्याने देशी दारूची बाटली पुढे करून म्हणाला की, तुझी तब्येत बरोबर नाही तर या बाटलीत ओआरएसची पावडर टाकली आहे तू पिऊन घे. त्याने ग्लासमध्ये बाटलीतील पाणी टाकत पीडीतेला पाजले.

यावेळी विवाहितेला त्यात दारू असल्याचे जाणवल्याने तिने ते पिण्यास नकार दिला. यावेळी ग्लासमधील उर्वरित दारू नवर्‍याने पिऊन घेतली. पत्नी यावेळी घरातील कामाला लागल्यानंतर सायंकाळी पतीने विचारले की, तुला ते पाणी पिल्याचा त्रास होत आहे का ? यावेळी पीडीतेने नाही म्हटल्यावर फिरोजने हिरव्या रंगाची भांगची गोळी आणून तिच्या तोंडात कोंबली आणि बळजबरीने पाणी पाजले. तिला नशा चढू लागताच त्याने त्याच्या एका मित्राला मागच्या दाराने बोलावून घेतले आणि पत्नीला तुला वेश्या व्यवसायासाठी बसवेन, असे सांगितले.

यावेळी पीडीता हात झटकून पळू लागली असता फिरोजने तिचे केस ओढून तू जर वेश्या व्यवसाय करणार नाही तर तुला जिवंत मारून टाकेल, अशी धमकी दिली. तुझ्या आई-वडिलांकडून पैसे मागव., असा दम भरला व नंतर पती फिरोज, जेठाणी तबससुम तन्वीर पिंजारी यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकारानंतर महिला घराबाहेर पळून गेली. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून पती, जेठाणी आणि अनोळखी तरुण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !