जामनेर-कुर्‍हा प्रवासादरम्यान चोरट्यांनी वृद्धाच्या खिशातून नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले


During the journey from Jamner to Kurha, thieves stole gold jewelry weighing nine tolas from an elderly man’s pocket भुसावळ (5 जुलै 2026) : जामनेर-भुसावळ प्रवासादरम्यान वृद्धाच्या खिशातून चोरट्यांनी नऊ तोळे व वजनाच्या जुन्या बाजारभावानुसार तीन लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
कांतीलाल मोतीलाल चोपडा (71, शेंगोळा, ता.जामनेर) हे वयोवृद्ध लोहारा (ता.पाचोरा) येथून भुसावळकडे येणार्‍या एस.टी.बसमध्ये शुक्रवार, 3 रोजी 11.20 ते 11.45 दरम्यान प्रवास करीत होते मात्र बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी जामनेर-कुर्‍हेपानाचे दरम्यान त्याच्या पँटच्या खिशातील पाऊच चोरी केले. या पाऊचमध्ये तब्बल 9 तोळे सोन्याचे दागिने होते. वाटेत बस थांबल्यानंतर चोरटा पसार झाला तर काही वेळेनंतर वृद्धाला दागिण्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. खिशातील दागिन्यांचे पाऊच चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर कांतीलाल चोपडा यांनी शनिवारी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास निरीक्षक नीलेश गायकवाड न्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय कंकरे करत आहेत.

नऊ तोळे वजनाचे दागिने लांबवले
चोरीला गेलेल्या पाऊचमध्ये तीन तोळे वजनाची सोन्याची पोत (किंमत एक लाख 20 हजार रुपये), 2.50 तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट (एक लाख रुपये), दोन तोळे वजनाच्या चार अंगठ्या (80 हजार रुपये), दीड तोळ्याची चेन (60 हजार) आदी मिळून तीन लाख 60 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांचा समावेश होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !