नशिराबादमधील तीन वर्षीय चिमुकलीचा हौदात पडल्याने मृत्यू

जन्मदिनानंतर पाच दिवसांनी क्रुर काळाचा घाला : परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर


Three-year-old girl from Nashirabad dies after falling into a water tank नशिराबाद (5 जुलै 2026) : नशिराबाद गावातील अवघ्या तीन वर्षाची चिमुकली खेळताना घराजवळील पाण्याच्या हौदात बुडून मृत पावली. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच तिने वयाची तीन वर्ष पूर्ण केल्याने कुटूंबाने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला मात्र हा आनंद औट घटकेचा ठरला. आकांक्षा प्रवीण (आबा) इंगळे असे मयत चिमुकलीचे नाव आहे.

खेळताना पडली हौदात
आकांक्षा ही घराच्या आवारात खेळत होती तर कुटुंबीय जेवणासाठी बसले असताना ती खेळता-खेळता घरच्या मागे असलेल्या पाण्याची हौदात पडली. बराच वेळ तिने न दिसल्यावर घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी ती पाण्याने भरलेल्या हौदात आढळून आली. तिला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

आकांक्षाचा जन्म 1 जुलै 2023 रोजी झाला व जुलै रोजी तिचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या आठवणी ताज्या असतानाच या चिमुकलीच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण भवानीनगर परिसर दुःखात बुडाला आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !