सांगवी-हिंगोणा दरम्यान मजूर नेणार्या वाहनाचे टायर फुटल्याने अपघात : 22 मंजूर जखमी
Accident involving vehicle transporting laborers between Sangvi and Hingona due to a burst tyre ; 22 laborers injured यावल (7 जुलै 2026) : फैजपूर रस्त्यावरील सांगवी-हिंगोणा दरम्यान मजूर घेऊन जाणार्या छोटी हत्त्त्ती वाहनाचे टायर फुटल्यामुळे अपघात घडल्याने त्यात 22 मजूर जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
टायर फुटल्याने अपघात
यावल-फैजपूर दरम्यान अंकलेश्वर-बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगवी ते हिंगोणा दरम्यान चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथून वाहन (क्रमांक एम.एच.43 बी.बी. 1264) मध्ये चालक मजुरांना घेवून न्हावी, ता.यावल येथे शेतात जात असतांना अचानक वाहनाचे टायर फुटले आणि वाहन रस्त्यावर उलटले. या अपघातामध्ये वाहनातील सर्व 22 मजूर हे जखमी झाले.

अनेकांची मदतीसाठी धाव
अपघात घडल्याचे निदर्शनास येताच भीम आर्मीचे कार्यकर्ते सागर मेघे, पंकज डांबरे, बबलू गजरे, सचिन पारधी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका 108 बोलवली. रुग्णवाहिकेवरील चालक मनोज भोईटे यांनी सर्व जखमींना वाहनात टाकून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.प्रज्वल मंत्री, अधिपरिचारीका माधुरी ठोके, नीलिमा राणे, चंद्रकला कोल्हे, लिना नेहेत, कादर तडवी, अमोल अडकमोल, भूषण गाजरे आदींनी या जखमींवर तातडीने उपचार केले. दरम्यान या सर्व मजुरांना दुखापतीसह हातापायांची हाडे फॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
हे मजूर झाले जखमी
शीतल पावरा (14), भुरी पावरा (12), मीना पावरा (24), मेहंदीबाई पावरा (30), महिमा पावरा (12), हिरालाल पावरा (26), श्वेता पावरा (15), दीपाली पावरा (14), जगन पावरा (13), मंगला पावरा (17), अनिता पावरा (17), शहनाज तडवी (28), आसीफ तडवी (24), सुनीता पावरा (15), विराज पावरा (21), आसीफ पावरा (24), गीता पावरा (13), राधा पावरा (33), नसरुद्दीन तडवी (27), बाला पावरा (9), राणीबाई पावरा (30), बाली पावरा (30) हे जखमी झाले. जखमींवर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णाला हलवण्यात आले.