जळगाव जिल्ह्यातून आठ वर्षात 2027 अल्पवयीन-मुला-मुलींचे अपहरण
पोलिसांच्या मोहिमेत परतली 95 टक्के मुले 99 मात्र अद्यापही बेपत्ता
2,027 minors abducted from Jalgaon district in eight years जळगाव (7 जुलै 2026) : जळगाव जिल्ह्यातून विविध कारणातून अपहरण अथवा घरातून पळाल्याने तब्बल 2027 मुले-मुली गायब झाली होती. पोलिसांनी राबवलेल्या मोहिम 95 टक्के मुले-मुली (1928) स्वगृही परतली असून 99 बालके अद्यापही बेपत्ता असल्याचे पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक
अपहरण होणार्या किंवा पळून जाणार्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कैक पटीने अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या एकूण दोन हजार 27 अपहरणांच्या प्रकरणांमध्ये 294 मुले आणि तब्बल एक हजार 733 मुलींचा समावेश आहे. यापैकी पोलिसांनी शोध घेतलेल्या एक हजार 928 जणांमध्ये 290 मुले आणि एक हजार 138 मुलींना शोधण्यात यश आले. अद्यापही शोध न लागलेल्या 99 जणांमध्ये चार मुले आणि 95 मुली आहेत.

वर्षनिहाय आलेख वाढताच
जिल्ह्यातील अपहरणाचा हा आलेख वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहे. 2018 मध्ये अपहरणाची एकूण संख्या 164 होती. ती 2024 मध्ये थेट 307 वर पोहोचली आणि 2025 मध्येही हा आकडा 307 वर कायम राहिला. चालू वर्षात म्हणजेच जून 2026 पर्यंत, अवघ्या पहिल्या सहा महिन्यांतच 225 मुला-मुलींचे अपहरण झाले आहे. या वाढत्या आकडेवारीवरून दरवर्षी हे प्रमाण किती वेगाने वाढत आहे, याची प्रचिती येते. दरम्यान, जळगाव पोलिसांचे ‘मिसिंग सेल’ 99 बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे.