आमोदा शेत-शिवारातून 15 क्विंटल केळीची चोरी


यावल (7 जुलै 2026) : यावल तालुक्यातील आमोदा शेत-शिवारात शेत गट क्रमांक 205 मधून अज्ञात चोरट्याने कापणी-योग्य झालेल्या केळीची चोरी केली. सुमारे 15 क्विंटल केळी चोरी झाली. शेतकर्‍यांचे 30 हजाराचे केळी घड लांबवण्यात आले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
आमोदा, ता.यावल या गावाच्या शेत शिवारात जितेंद्र दिनकर कोल्हे रा. त्रिमूर्ती चौक, फैजपूर यांचे शेत गट क्रमांक 205 आहे. या शेतात त्यांनी केळी लागवड केली असून ही केळी आता कापणी योग्य झालेली आहे. त्यांच्या या शेतातून तब्बल 80 केळीच्या झाडावरील केळी घड अज्ञात चोरट्याने चोरी केले आहे. सुमारे 15 क्विंटल केळी येथून चोरी झाली असावी असा अंदाज असून 30 हजार रुपये किमतीची ही केळी येथून चोरी करण्यात आली आहे. तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात जितेंद्र कोल्हे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोती पवार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !