भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा : निल वारकेची वर्ल्ड क्लाइंबिंगसाठी निवड


भुसावळ (8 जुलै 2026) : शहरातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाचे प्रा.कै.सी.आर. वारके यांचा नातू नील संजय वारके हा वर्ल्ड यूथ क्लाइंबिंग चॅम्पियनशिपसाठी 15 जुलै रोजी रवाना होत आहे. ही निवड खानदेश
आणि महाराष्ट्रासाठी व देशासाठी अभिमानाची बाब आहे.

भारतीय संघात निवड
पुण्यातील खान्देशी युवा स्पोर्ट क्लाइंबर नील वारके याची आर्को, इटली येथे 18 जुलै ते 26 जुलै दरम्यान होणार्‍या (वर्ल्डकप) साठी भारतीय संघात निवड झाली आहे. जगभरातील सर्वोत्तम युवा गिर्यारोहक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने नील वारकेच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

नील वारकेच्या यशामागे त्याचे प्रशिक्षक अमोल जोगदंड, मान्तू मंत्री, इरफान शेख व विकी सरांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि मेहनत तसेच मार्गदर्शक व वेस्ट झोन सचिव श्रीकृष्ण कडूसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
नील वारके जागतिक स्पर्धेत भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी करून देश, महाराष्ट्र आणि पुण्याचे नाव उंचावेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी आणि गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !