प्रवाशांनो लक्ष द्या : भुसावळ-दादर व दादर-भुसावळ एक्सप्रेस उद्या रद्द
भुसावळ (8 जुलै 2026) : खान्देशातील प्रवाशांना अत्यंत सोयीची असलेली भुसावळ-दादर व दादर-भुसावळ एक्स्प्रेस रॅक नसल्याच्या कारणास्तव गुरुवार, 9 रोजी रेल्वे प्रशासनाने रद्द केली आहे. ऐनवळी गाडी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
गाडी क्रमांक 19003 भुसावळ-दादर एक्सप्रेस गुरुवार, 9 रोजी भुसावळ येथून पूर्णतः रद्द असेल तर गाडी क्रमांक 19004 दादर-भुसावळ एक्सप्रेस गुरुवार, 9 रोजी दादर येथून पूर्णतः रद्द राहील.

प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.