गद्दारांच्या छताखाली बैठका कशाला ? खासदार संजय राऊत
नांदेड (9 जुलै 2026) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली असून ती राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, यात शंका नाही मात्र ज्यांनी आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने नेत्यांची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते, अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली.
एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची कीड लावली आहे. पवारांना बैठकीसाठी अख्खे विधानभवन काय ओस पडले होते का? समोरच वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी भवन असताना गद्दाराच्या दारात जाणे आम्हाला पटत नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले राऊत?
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सध्या कमालीचे वैफल्यग्रस्त झाले आहेत. जोपर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर आहेत, तोपर्यंत राज्यात फावडं घेऊन पैसे काढण्याचे काम सुरू आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर ते रोज खोटे बोलत असून, विधानसभा अध्यक्षांना मराठी येत नाही, हीच खरी राज्याची बदनामी आहे. फडणवीसांनी आरएसएसने लिहिलेला खोटा इतिहास वाचू नये, हवे तर मी त्यांना खरी इतिहास संशोधक पुस्तके पाठवतो, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.