भुसावळात पालिका कर्मचार्‍यावर गोळीबार करणार्‍या संशयीतांना तीन दिवसांची पोलीस कोठडी : गावठी कट्टा जप्त


Suspects who opened fire on a municipal employee in Bhusawal remanded to three days’ police custody ; country-made pistol seized भुसावळ (9 जुलै 2026) : शहरातील पालिका कर्मचारी असलेल्या 30 वर्षीय तरुणावर रेल्वे व्यवसायाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना राहुल नगरात सोमवार, 6 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बाजारपेठ पोलिसांनी तपासात आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला कट्टा जप्त केला आहे.

असे आहे गोळीबार प्रकरण
पालिका कर्मचारी धरमसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडित (30, राहुल नगर, बालाजी मंदिराजवळ, भुसावळ) हा तरुण सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घराजवळील वैभवी ट्रेडर्स या दुकानावर बसला असताना संशयीत अमोल विनोद देवरे (19, रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ) व अनिकेत कालू मनोज जाधव (21, वाल्मीक नगर, भुसावळ) हे दुचाकीवरून आले व अनिकेतने आपल्या जवळील गावठी कट्ट्याने दोन गोळ्या गोलू पंडितच्या दिशेने झाडल्या मात्र जीव वाचवण्यासाठी तरुणाने पळ काढल्याने तरुणाचे प्राण वाचले तर संशयीत घटननेनंतर पसार झाले होते. बाजारपेठ पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर गुन्ह्यात वापरलेला कट्टा पोलिसांनी जप्त केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल काळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !