जळगाव पोलिस दलात फेरबदल : सहा सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

दोघांच्या विनंती तर तिघांच्या प्रशासकीय व नव्याने आलेल्या अधिकार्‍याला मिळाले पोलिस ठाणे


गणेश वाघ
Reshuffle in Jalgaon Police Force : Six Assistant Police Inspectors Transferred भुसावळ (9 जुलै 2026) : जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल करण्यात आले असून सहा सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तसेच सहा पोलिस उपनिरीक्षकांच्याही विविध कारणास्तव बदल्या करण्यात आल्या. जळगावचे नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बदल्यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

चार अधिकार्‍यांची प्रशासकीय कारणाने बदली
पहूरचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे यांना जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत तर नियुक्तीच्या प्रतीक्षेतील सहा.निरीक्षक प्रवीण दातरे यांना पहूर ठाण्याच्या प्रभारी नियुक्ती मिळाली. जळगाव नियंत्रण कक्षात संलग्न सहा.निरीक्षक भरत चौधरी यांना पुनश्च चाळीसगाव शहर ठाण्यात तर जळगाव नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक राजू सांगळे यांना पिंपळगाव हरेश्वर ठाण्यात नियुक्ती मिळाली.

पाच नवीन अधिकार्‍यांना पोस्टींग
छत्रपती संभाजीनगरातून आलेले सहा.निरीक्षक प्रदीप कारभारी शेवाळे यांना पाचोरा ठाण्यात नियुक्ती मिळाली या शिवाय नवी मुंबईहून आलेले उपनिरीक्षक अब्दुलगणी अरमान तडवी यांना नियंत्रण कक्षात तर नागपूरातून आलेले उपनिरीक्षक सखाराम एकनाथ कांबळे यांना रावेर ठाण्यात नियुक्ती देण्यात आली. नागपूर शहरातून आलेल्या उपनिरीक्षक सावित्री भगवान ढगे यांना जळगाव शहर तर अहिल्यानगरचे उपनिरीक्षक संपत सूर्यभान कन्हेरे यांना एरंडोल ठाण्यात नियुक्ती मिळाली.

तीन अधिकार्‍यांच्या विनंती बदल्या
आर्थिक गुन्हे शाखेचे सहा.निरीक्षक प्रमोद वाघ यांना एमआयडीसी ठाण्यात तर एएचटीयुचे सहा.निरीक्षक हरिदास बोचरे यांना रावेर ठाण्यात व पिंपळगाव हरेश्वरचे उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांना एमआयडीसी ठाण्यात नियुक्ती मिळाली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !