चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई : सहा लाख 57 हजारांचा गुटखा जप्त
स्थानिक पाच आरोपींना बेड्या : कारवाईने गुटखा तस्कर हादरले
Major action by Chalisgaon City Police: Gutkha worth ₹6.57 lakh seized चाळीसगाव (10 जुलै 2026) : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्रीसाठी शहरात येताच कारवाई करीत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या व त्यांच्याकडील सहा 6 लाख 57 हजार 87 रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने शहर व परिसरातील गुटखा तस्कर हहारले आहेत.
या आरोपींना अटक
शहर पोलिसांनी अजित चांदूमल रावलानी (43), कुबेर शेखर कसम (27), हितेश किशोर पवार (21), निखील राजेंद्र केसरवाणी (31), सौरभ संजय शिंगणे (27, सर्व रा.चाळीसगाव) यांना अटक केली. आरोपींविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गुरुवार. 9 जुलै 2026 रोजी मध्यरात्री हनुमानवाडी, आनंदवाडी आणि बसस्थानक परिसरात एकाचवेळी छापेमारी करून कारवाई करण्यात आली. आरोपींनी बर्हाणपूर येथून हा गुटखा विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

कारसह गुटखा जप्त
कारवाईदरम्यान विमल पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, पान पराग, आरएमडी, रजनीगंधा, राजश्री, राजनिवास, मिराज, केर कोकिल, तुळशी-00, रॉयल जाफरानी जर्दा, एम सुगंधी तंबाखू, बाबा, शॉट, केपी डबल ब्लॅक, झेडएन-01 जाफरानी जर्दा यासह विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा तसेच इंडिका कार (एम.एच.18 डब्ल्यू 8977) जप्त करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर निरीक्षक अमितकुमार मनेळ, उपनिरीक्षक संदीप घुले, हवालदार राहुल सोनवणे, कॉन्स्टेबल मोहन सूर्यवंशी, अशोक मोरे, कल्पेश पगारे आदींच्या पथकाने केली.
