90 हजारांची लाच घेताना पोलिस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
चिकन व्यावसायीकाला गुटख्याची विक्री करीत असल्याचा दम भरत उकळली लाच
गणेश वाघ
Police official caught in ACB trap while accepting a bribe of ₹90,000. भुसावळ (11 जुलै 2026) : चिकनचा व्यवसाय करणार्या व्यावसायीकाला गुटख्याची वाहतूक करीत असल्याचा दम भरून कारवाईची भीती दाखवत 90 हजारांची लाच मागण्यात आली मात्र तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर सापळा रचून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी अंमलदाराला बेड्या ठोकल्या. ही कारवाई शुक्रवार, 10 जुलै रोजी रात्री उशिरा करण्यात आली. या घटनेमुळे पोलिस दलातील लाचखोर हादरले आहेत. मनोज दगू गायकवाड (37) असे अटकेतील पोलिस अंमलदाराचे नाव असून तो नाशिक ग्रामीण अंतर्गत येणार्या पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे चिकन विक्रीचा व्यवसाय करतात व गुजरातच्या सुतारपाडा गावात त्यांचे चिकन शॉप आहे. कोंबड्याची खरेदी करून ते स्वीप्टने कोंबड्या व्यवसायासाठी नेतात. अंमलदार गायकवाड जून महिन्यात वाहन अडवत तक्रारदाराला गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची भीती घातली व कारवाई न करण्यासाठी 60 हजार रुपये उकले व त्यानंतरही गायकवाड यांचा त्रास थांबला नाही. 5 जुलै रोजी गायकवाड याने फोन करीत गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे सांगत कोंबड्याचीही वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी एक लाखांची लाच मागितली मात्र यावेळी तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली असता तडजोडीअंती आरोपीने 90 हजारांचे लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
हॉटेलबाहेर सापळा रचून पकडले
राऊ हॉटेल समोरील आमदार गुळाचा चहा दुकानासमोर लाच स्वीकारण्यासाठी गायकवाड आला व त्याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच पथकाने त्यास अटक केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 (सुधारित 2018) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ, हवालदार प्रमोद चव्हाणके, अंमलदार संजय ठाकरे, अंमलदार योगेश शिंदे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
लाचखोरांविरोधात आवाहन
लाच मागणार्या किंवा भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार टोल फ्रि क्रमांक 1064 वर नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.
