दहा हजारांची लाच भोवली : सहाय्यक निबंधक एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराविरोधात प्रकरण मिटवल्याच्या मोबदल्यात लाच : लाचखोरांमध्ये खळबळ


गणेश वाघ
Bribe of ₹10,000 proves costly: Assistant Registrar falls into ACB trap नाशिक (11 जुलै 2026) : तक्रार निकाली काढण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना कर्जतच्या सहाय्यक निबंधकाला अहिल्यानगर एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. मिलिंद प्रल्हादराव राऊत (50) असे अटकेतील आरोपीचे नाव असून ते कर्जत, जि.अहिल्यानगर येथील सहकारी संस्थेत सहाय्यक निबंधक आहेत. या कारवाईने सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे एका विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा, यासंदर्भातील ठराव मंजुरीसाठी सहायक निबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. या प्रक्रियेदरम्यान पुण्यातील एका संचालकाला नोटीस न मिळाल्याने संबंधित ठरावाविरोधात संचालकाने तक्रार दाखल झाली होती. ही तक्रार निकाली काढण्यासाठी मिलिंद राऊत यांनी सुरुवातीला 25 हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर त्यातील 10 हजार रुपये यापूर्वी स्वीकारण्यात आल्याने उर्वरित 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली. पडताळणीत 15 हजारांची लाच मागून दहा हजार रुपये स्वीकारल्याचे ठरल्याचे स्पष्ट होताच सापळा रचण्यात आला व आरोपीने लाच स्वीकारताच त्याला अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वात हवालदार संतोष शिंदे, वैभव सुपेकर, बाबासाहेब कराड, चालक हवालदार हारून शेख
आदींनी सापळा यशस्वी केला. तपास पोलीस निरीक्षक सविता तांबे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !