भुसावळात रिक्षा चालकाची गळफास घेत आत्महत्या
Rickshaw driver commits suicide by hanging in Bhusawal भुसावळ (रविवार, 12 जुलै 2026) : शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करून गुजराण करणार्या 58 वर्षीय रिक्षा चालकाने राहत्या घरात गळफास घेता. ही धकक्कादायक घटना शहरातील गणेश कॉलनी, जळगाव रोड परिसरात शनिवार, 11 रोजी दुपारी घडली. विनोद पंडित बाविस्कर (58) असे आत्महत्या करणार्या रिक्षा चालकाने नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शहर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बाविस्कर यांनी राहत्या घरातील खोलीत शनिवारी दुपारच्या सुमारास गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्यांना घरातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हर्षा चौधरी करीत आहेत.

