भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या जळगाव जिल्हा पूर्व उपाध्यक्षपदी राहुल तायडे


भुसावळ (13 जुलै 2026) : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जळगाव जिल्हा पूर्व उपाध्यक्षपदी शहरातील राहुल वसंत तायडे यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा, जळगाव (पूर्व) जिल्हा कार्यकारणी भाजपच्या राज्य व जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ही निवड घोषित करण्यात आली.

नुकतीच कार्यकारिणी जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच भाजपा नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपा पक्ष श्रेष्ठी विभाग संयोजक विजयराव चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड, जिल्हा प्रभारी अनुपभैय्या अग्रवाल, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (राजुमामा), आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार नंदकिशोर महाजन, भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजप राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे यांच्या मार्गदर्शनाने अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ मंडळ माजी अध्यक्ष राहुल वसंत तायडे यांच्याकडे असलेले संघटनात्मक कार्यातील अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष या प्रमुख पदावर पदोन्नती झाली आहे.

निवडीचे सर्व स्तरातून स्वागत
संघटन विस्तार, पक्षाची विचारधारा तळागळापर्यंत पोहोचविणे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यासाठी नव्या कार्यकारिणीला जबाबदारी देण्यात आली. या निवडीबद्दल भुसावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या विविध पदाधिकार्‍यांनी स्वागत केले आहे. नव्या पदाधिकार्‍यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि अनुसूचित जाती समाजातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !