चितोड्याजवळ गोमांस वाहतूक : एकाविरोधात गुन्हा


यावल (मंगळवार, 14 जुलै 2026) : यावल तालुक्यातील चितोडा या गावाजवळून संशयीत दुचाकीवरून एका पोत्यामध्ये गोमांस वाहतूक करीत असताना यावल पोलिसांनी त्यास अटकावले. पथक येताच संशयीताने गोमांस असलेले पोते रोडवर फेकून पोबारा केला. या प्रकरणी यावल पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
चितोडा गावाजवळून फैजपूरकडून यावल कडे दुचाकीद्वारे सईद शाह (55, रा.यावल) हा इसम मंगळवारी सकाळी गोणीमध्ये गोमांस आणत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला थांबण्यासाठी आवाज दिल्यानंतर त्याने गोमांस असलेले पोते रस्त्यावर फेकून पळ काढला.

पोते फाटल्यानेे रस्त्यावर सर्वत्र गोमांस विखुरले. गोमांसचा पंचनामा करण्यात आल्यानंतर याप्रकरणी यावल पोलिसात पोलिस हवालदार अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !