यावल शहरातील गुरुनानक इलेक्ट्रिकमधून शेगडी चोरी : चोरटा सीसीटीव्हीत कैद
Heater stolen from Guru Nanak Electric in Yaval city ; thief caught on CCTV यावल (बुधवार, 15 जुलै 2026) : यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेल्या गुरुनानक इलेक्ट्रिकल्स नावाच्या दुकानातून एकाने इलेक्ट्रिकल इंडक्शन शेगडी चोरी केली. ही घटना बुधवारी घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. याप्रकरणी यावल पोलिसात तक्रार देण्यात आली.
काय घडले यावल शहरात ?
शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे. टी. महाजन व्यापारी संकुल आहे. या संकुलात कन्हैया कैलाश जुमनानी यांचे गुरुनानक इलेक्ट्रिकल्स नावाचे दुकान आहे. या दुकानांमध्ये बुधवारी सकाळी 11.30 वाजता एक संशयीत साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने आला व दुकानाबाहेर जाताना त्याने तीन हजार 260 रुपये किंमतीची इलेक्ट्रिकल इंडक्शन शेगडी अलगत चोरी केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला व हा प्रकार कन्हैया जुमनानी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यावल पोलिसात तक्रार दिली.

