30 वर्षीय विवाहितेचे अपहरण करीत बलात्कार : अमळनेर तालुक्यातील आरोपीला बेड्या


अमळनेर (बुधवार, 15 जुलै 2026) : लाडकी बहीण योजना आणि मोलमजुरीचे जमा झालेले पैसे दागिने करण्यासाठी वापरू, असे आमिष दाखवून एका 30 वर्षीय विवाहितेचे आठ वर्षांच्या मुलासह अपहरण करण्यात आले. त्यानंतर दोन महिने विवाहितेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

काय घडले विवाहितेसोबत ?
पीडित विवाहितास ही अमळनेर तालुक्यातील रहिवासी असून ती शेतमजुरी करते. तिचे पती तिला सोडून गेलेले असल्याने ती आई-वडिलांकडे राहते. गावातील एका महिला कंत्राटदाराकडे काम करत असताना पीडितेने तिच्याकडे लाडकी बहीण योजना आणि मजुरीचे मिळून एकूण 70 हजार रुपये जमा केले. हे पैसे सोन्याचे दागिने करण्यासाठी वापरू, असे सांगून तिला अमळनेर येथे नेण्यात आले.

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराजवळ पोहोचल्यानंतर, संशयित आरोपी सुदाम भगवान भिल्ल (रा.कलाली, ता.अमळनेर) याने कारमध्ये बसवले मात्र रस्ता दुसरीकडे जात असल्याने विवाहितेने विरोध केल्यानंतर आरोपीने माझ्यासोबत आली नाहीस तर तुला आणि तुझ्या मुलाला मारून टाकीन, अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने पीडितेला आधी बहाळ (चाळीसगाव) येथील एका कच्च्या झोपडीत 15 ते 20 दिवस ठेवण्यात आले व त्यानंतर शिरपूर जवळील विमानतळा शेजारील एका तांड्यावर सुमारे दोन महिने डांबून ठेवले. या काळात मुलाला जीवे मारण्याची भीती दाखवून आरोपी तिच्यावर सातत्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

प्रसंगावाधान राखत पीडीतेची सुटका
16 जून 2026 रोजी आरोपी सुदाम काही कामानिमित्त बाहेर गेला असता, पीडितेने प्रसंगावधान राखून मुलासह तिथून पळ काढला. तिने खाजगी वाहनाने शिरपूर तालुक्यातील कमखेडा येथील आपल्या बहिणीचे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांच्या सल्ल्याने अखेर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी मारवड पोलिसात अपहरणाचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. मारवड पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक साजीद मजीद मन्सूरी यांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी सुदाम भगवान भिल्ल याला मंगळवार, 14 जुलै 2026 रोजी रात्री 9.37 वाजता अटक केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !