भुसावळातील जुना सातारा परिसरात तरुणाची आत्महत्या


भुसावळ (शुक्रवार, 17 जुलै 2026) : शहरातील जुना सातारा, राम मंदिराजवळ राहणार्‍या 25 वर्षीय तरुणाने गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सुदेश ज्ञानेश्वर पाटील (25) असे मृताचे नाव आहे.

असे आहे प्रकरण
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुदेश हा गुरुवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास कामावरून उशिरा घरी परतला होता. शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत तो उठत नसल्याने कुटुंबीयांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला.

यानंतर अविनाश पाटील व त्यांचे काका ज्ञानेश्वर पाटील यांनी मिळून दार तोडून आत प्रवेश केला असता सुदेश हा छताला बसवलेल्या लोखंडी हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हे दृश्य पाहताच कुटुंबीयांनी तत्काळ शहर पोलिसांना कळविले.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला व पुढील कार्यवाहीसाठी ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालात हलवला.

या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात मृताचा चुलत भाऊ अविनाश कमलाकर पाटील (34) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश बिर्‍हाडे करीत आहेत. दरम्यान, सुदेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !