भुसावळ शहरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
भुसावळ (शुक्रवार, 17 जुलै 2026) : शहरातील गरुड प्लॉट परिसरात घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढत्या चोर्यांनी वाहन धारक धास्तावले
कल्पेश प्रभाकर किर्तीकर (44, काशीनाथ लॉज मागे, गरुड प्लॉट, भुसावळ) हे व्यवसायाने चालक आहेत. त्यांच्या पत्नी दीपाली यांच्या नावावर सन 2023 मध्ये सुझुकी कंपनीची ‘अॅक्सिस 125’ (क्र. एम.एच.19 ई.सी.8015) ही दुचाकी होती व या दुचाकीचा वापर घरगुती कामांसाठी केला जात होता.


शनिवार, 11 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता किर्तीकर यांनी दुचाकी घरासमोर उभी केली मात्र दुसर्या दिवशी रविवार, 12 जुलै रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता बाहेर येऊन पाहणी केली असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. यानंतर त्यांनी पत्नीशी विचारपूस केली असता तिनेही दुचाकी वापरली नसल्याचे सांगितले.
त्यानंतर परिसरात तसेच रेल्वे स्थानक, बसस्थानक व इतर ठिकाणी शोध घेऊनही दुचाकी मिळून आली नाही त्यामुळे अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी चोरून नेल्याची खात्री झाल्याने किर्तीकर यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरी गेल्याची तक्रार दाखल केली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील करीत आहेत.