उघड्यावर दारू पिल्यास खावी लागेल जेलची हवा : जळगावात 107 मद्यपींवर कारवाई


Drinking alcohol in public could land you in jail: Action taken against 107 drinkers in Jalgaon जळगाव (शनिवार, 18 जुलै 2026) : जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍या व्यक्तींविरुद्ध जळगाव पोलीस दलाने शुक्रवा, 17 जुलै विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. या मोहिमेत महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत एकूण 107 व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेदरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 112/117 अंतर्गत 105 व्यक्तींवर, तर कलम 85(1) अंतर्गत 2 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍यांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली.


जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कारवाई सुरूच राहणार
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान टाळण्याचे, कायद्याचे पालन करण्याचे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यापुढेही शहर व जिल्ह्यात अशाच पद्धत्तीने धडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !