जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची सोशल मिडीयात बदनामी : गेवराईच्या आरोपीला अटक


Defamation of Water Resources Minister Girish Mahajan on social media: Accused from Georai arrested जळगाव (रविवार, 19 जुलै 2026) : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबत फोटो मार्फ करून सोशल मिडीयात बदनामी करण्यात आली होती. जळगाव सायबर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान बीड जिल्ह्यातील गेवराईच्या भरत बालाजी म्हस्के याच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले आहे.

काय आहे प्रकरण ?
जळगावचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी 19 जून 2026 रोजी सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, राज्याचे संकटमोचक तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे फोटो एका तरुणीसोबत एआय तंत्रज्ञानाद्वारे (मॉर्फ) करून त्यासोबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियातील फेसबुक प्लॅटफार्मवर प्रसारित करण्यात आला. या प्रकरणी भरत बालाजी म्हस्के (जळगाव) विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तपासादरम्यान आरोपी जाळ्यात
जळगाव सायबर सेलकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोंदी खुर्दच्या भरत म्हस्केचे नाव समोर आले. सायबर पथकाने आरोपीवर पाळत ठेवली व तो इंदापूर , जि.पुणे येथे आल्याची माहिती मिळवल्यानंतर त्याच्यावर झडप घातली. आरोपीच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला तसेच आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयातून हटवण्यात आली शिवाय सहा हजार फालोअर्स असलेले आरोपीचे फेसबुक खाते सहयोग पोर्टलद्वारे कायमस्वरुपी सस्पेन्ड करण्यात आले.

यांनी केली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, हवालदार हेमंत महाडीक, नाईक सचिन सोनवणे, निखील नारखेडे, चालक एएएसआय सुधीर भंडारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !