चोपडा पोलिसांची मोठी कारवाई : दोन किलो गांजासह शिरपूरच्या संशयीताला बेड्या
Major crackdown by Chopda police: Shirpur suspect arrested with two kilograms of cannabis चोपडा (रविवार, 19 जुलै 2026) : चोपडा शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चोपडा-शिरपूर मार्गावरील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ शिरपूरातील संशयीताकडून दोन किलो गांजा जप्त केला आहे. गांजासह दुचाकी आणि मोबाईल मिळून एक लाख एक हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा निरीक्षक पवन देसले यांना शुक्रवार, 17 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजेच्या सुमारास चोपडा-शिरपूर रोडवरील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ एक संशयीत गांजा आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. यावेळी पथकाने विजय मुसा पावरा (35, रा. महादेव दांडवाडे, ता. शिरपूर, जि. धुळे) यास ताब्यात घेतल्यानंतर झडतीदरम्यान त्याच्या ताब्यातून 2.120 किलो गांजा जप्त केला.


21 हजार 200 रुपये किंमतीचा गांजा, 70 हजारांची दुचाकी, 10 हजारांचा मोबाईल असा एकूण एक लाख एक हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.