मुक्ताईनगर तालुक्यातील विवाहितेवर अत्याचार : एकाविरोधात गुन्हा


मुक्ताईनगर (बुधवार, 22 जुलै 2026) : विवाहितेसोबत बोलण्याची रेकॉर्डींग असल्याचे सांगत संशयीताने 30 वर्षीय विवाहितेला ब्लॅकमेलिंग करीत अत्याचार केला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात 30 वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. या विवाहितेच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी ईश्वर प्रकाश लवांडे (रा.मुक्ताईनगर तालुका) याने गेल्या महिन्यापासून ते 18 जुलै दरम्यान पीडितेला त्रास दिला. दोघांमधील संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचे सांगत, तू मला भेटण्यासाठी बाहेर ये, अन्यथा हे कॉल रेकॉर्डिंग तुझ्या पतीला पाठवेल, अशी धमकी आरोपीने दिली तसेच तुझ्या पतीला जीवे मारीन, अशी धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने घोडसगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केला.

तपास पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोली उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !