वाघूरच्या वाळूची चोरी : 20 लाखांचे दोन डंपर भुसावळ तालुका पोलिसांकडून जप्त
भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : वाघूर नदीपात्रातून सर्रासपणे अवैधरित्या वाळूची चोरी होत असताना भुसावळ तालुका पोलिसांनी कारवाई करीत 20 लाख रुपये किंमतीचे दोन डंपर व त्यातील 32 हजारांची वाळू जप्त केली. या कारवाईने अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.
दोन डंपरसह वाळू जप्त
बुधवार, 22 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास सुनसगाव-वाघूर नदीपूलाजवळ डंपर (एम.एच.19 झेड.0932) वरील चालक अनिल सुपडू सोनवणे (बांभोरी, ता.धरणगाव) हा 12 हजार रुपये किंमतीची तीन ब्रास वाळू चोरी करताना आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी हवालदार महेश एकनाथ चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याच दिवशी डंपर क्रमांक (यु.पी.53 जी.
टी.1171) वरील चालक आकाश सुरेश पारधी (25, धानोरा, ता.चोपडा) हा 20 हजार रुपये किंमतीची पाच ब्रास वाळू चोरी करताना आढळल्याने त्याच्याविरोधात हवालदार महेश चौधरी यांनी गुन्हा दाखल केला.
तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडेड उपनिरीक्षक संजय कंखरे व हवालदार धीरज मंडलिक करीत आहेत.




