भुसावळातील संविधान नगरात घरफोडी : आठ हजारांचे साहित्य लांबवले
भुसावळ (बुधवार, 22 जुलै 2026) : शहरातील लोणारी हॉलजवळील संविधान नगरात बंद घराचे कुलूप लोखंडी टॉमीने तोडून दोन संशयीतांनी आठ हजारांचे साहित्य लांबवले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
मयूर संदीप लोखंडे (18) हे संविधान नगरात राहतात. 21 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास संशयीत बाबू सिकंदर शेख (कवाडे नगर, भुसावळ) व संदीप रेवाराम कहार (नॉर्थ कॉलनी, भुसावळ) यांनी आकाश याच्याकडून लोखंडी सब्बल घेवून घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. संशयीताने तीन हजार रुपये किंमतीचा टीव्ही, अडीच हजार रुपये किंमतीचे सिलिंडर व दिड हजार रुपये किंमतीच्या संसारोपयोगी वस्तू (स्टील भांडी) आदी लांबवल्या. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रज्जाक खान करीत आहेत.




