भुसावळात रेल्वे अभियंत्याचे घर फोडले : 38 ग्रॅम वजनाचे दागिने लंपास


भुसावळ (गुरुवार, 23 जुलै 2026) : शहरातील रेल्वेत नोकरीला असलेल्या अभियंत्याचे सहकार नगरातील एकदंत अपार्टमेंटमधील घर चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार 18 ते 20 दरम्यान घडला. चोरट्यांनी तब्बल 38 ग्रॅम वजनाचे दागिने लांबवत पोलिसांच्या गस्तीला आव्हान दिले. याचदरम्यान नीलकंठ अपार्टमेंटमध्येही घरफोडीचा प्रकार समोर आला. एक लाख चार हजारांचे दागिने लांबवल्याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी दागिन्यांची किंमत जुन्या बाजारभावानुसार लावली असलीतरी एकूण 38 ग्रॅम दागिन्यांचे आजच्या बाजारभावानुसार मूल्य सहा लाखांवर आहे.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
शहरातील सहकार नगरातील एकदंत अपार्टमेंटमध्ये रेल्वेतील अभियंता राहुल सोपान तोमर (36) हे परिवारासह वास्तव्यास आहे. तोमर कुटूंब गावाला गेल्याने प्लॅट 18 ते 20 जुलैदरम्यान बंद असल्याची चोरट्यांनी साधली. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्लॅटमध्ये प्रवेश करीत कपाटातील सहा ग्रॅम वजनाची व 30 हजार रुपये किंमतीची अंगठी, 25 गॅ्रम वजनाच्या व 50 हजार रुपये किंमतीच्या बांगड्या, चार ग्रॅम वजनाचे व आठ हजार रुपये किंमतीचे कानातले, तीन गॅ्रम वजनाची व चार हजार रुपये किंमतीची सोन्याची बाळी, चार हजार रुपये किंमतीचे पायातील पैंजण, तीन हजार रुपये किंमतीचे चांदीचे ब्रासलेट, पाच हजार रुपये किंमतीचे चांदीची गळ्यातील चैन असा एकूण एक लाख चार हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.

नीलकंठ अपार्टमेंटमध्येही घर फोडले
चोरट्यांनी याचदरम्यान सहकार नगरातील नीलकंठ अपार्टमेंटमध्ये जयगोविंदा लक्ष्मण पलई यांच्या प्लॅटमधून मौल्यवान ऐवज लांबवला. नेमका काय ऐवज चोरीला गेला याची माहिती कळू शकली नाही. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेडेड उपनिरीक्षक अनिल सुरवाडे करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !