निसर्डी येथे अवैधरित्या मुरूमाची वाहतूक करणारा डंपर पकडला
अमळनेर (शुक्रवार, 24 जुलै 2026) : निसर्डी शिवारात अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारे डंपर महसूल व पोलीस पथकाने 21 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास पकडले. नऊ लाख 59 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निसर्डी येथे अवैध मुरूम वाहतूक करीत असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना मिळताच त्यांनी मंडळाधिकारी संजय धोंडू चव्हाण व ग्राम महसूल अधिकारी प्रसाद पाटील, सहाय्यक फौजदार फिरोज बागवान, हेड कॉन्स्टेबल प्रवीण पारधी, प्रवीण पाटील यांनी छापा टाकला असता तेथे डंपर (क्रमांक एम.एच.20 ई.एल.2355) हा अवैधरित्या मुरूम वाहतूक करताना आढळून आला.
पथकाने मालक व चालकाला नाव विचारले असता त्याने आलिमखान सलीमखान पठाण (27, अमलेश्वर नगर) असे सांगितले. मंडळाधिकारी यांनी फिर्याद दिल्यावरून आलिमखान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील करीत आहेत.



