भुसावळात भंगार चोरट्याचा 28 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला
भुसावळ (शुक्रवार, 24 जुलै 2026) : शहरात भंगार चोरीच्या वादातून दोन खुनांच्या घटना ताज्या असतानाच रेल्वे कॉलनीत भंगार चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरट्याने धुणी-भांडी करणार्या 28 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना 23 रोजी सकाळी 10.30 वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भंगार चोरट्यांचा मुद्दा पुन्हा नव्याने समोर आला आहे.
काय आहे प्रकरण ?
रेल्वे अधिकारी, कर्मचार्यांच्या गोदावरी कॉलनीत आर.बी.2, 903 अ मध्ये तक्रादार सुनीता कुमारी अमर कुमार (28, भुसावळ) या गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास धुणी-भांडी करीत असताना अज्ञात संशयीत घराच्या छतावरून दाखल झाला. यावेळी सुनीता कुमारी यांनी जोर-जोरात आरडा-ओरड केल्यानंतर आरोपीने महिलेने गुपचूप बसावे म्हणून धारदार वस्तूने हल्ला केला व आरोपीने पलायन केले. महिलेवर उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाख करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल लोकेश तडवी करीत आहेत.



