यावल शहरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून धमकी : दहिगावच्या तरुणाविरोधात गुन्हा
यावल (रविवार, 26 जुलै 2026) : शहरातील एका विद्यालयाच्या परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा एका तरूणाने पाठलाग करीत वारंवार त्रास देत तिला धमकावले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी दहिगावच्या युवकाविरुद्ध यावल पोलिसात पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
यावल शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेणार्या ग्रामिण भागातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तन्मय लक्ष्मण महाजन (20, रा. दहिगाव, ता. यावल) याने पाठलाग केला. तसेच विद्यालय परिसरात, सार्वजनिक ठिकाणी पाठलाग करून तिला त्रास दिला तसेच तिच्यावर लक्ष ठेवून धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी पीडीत मुलीने आपल्या पालकांना सांगीतला. या प्रकरणी यावल पोलिसात पीडितेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक एम.जे. शेख करीत आहे.



